ताज्या घडामोडी

कोथुर्णेतील दुर्दैवी कु.स्वरा चांदेकर हिच्या मारेक-याचे आरोपपञ न घेण्याचा वडगाव मावळ बार आसोसिएशनचा एकमताने ठराव..

आपल्याला झालेल्या दुःखात आम्ही वडगाव मावळ बार असोसिएशनचे सर्व सदस्य आपले दुःखात सहभागी आहोत.

Spread the love

कोथुर्णेतील दुर्दैवी कु.स्वरा चांदेकर हिच्या मारेक-याचे आरोपपञ न घेण्याचा वडगाव मावळ बार आसोसिएशनचा एकमताने ठराव..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.५प्रतिनिधी

कोथुर्णेतील दुर्दैवी कु.स्वरा चांदेकर हिच्या मारेक-याचे आरोपपञ न घेण्याचा वडगाव मावळ बार आसोसिएशनचा एकमताने ठराव करण्यात आल्याचे पञ ता.४ रोजी वडगाव मावळ बार आसोसिएशनचे वतीने कै.स्वरा जनार्धन चांदेकर हिचे वडील .जनार्धन चांदेकर यांना देण्यात आले.
वडगाव मावळ बार आसोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र घोजगे यांची सही आसलेल्या या पञात स्वराचे वडिलांना उद्देशून असे म्हटले आहे की , आपली कन्या कु.स्वरा जनार्धन चांदेकर हिचे ता.३ आॕगष्ट २०२२ रोजी दुर्दैवी असे निधन झाले.
सदरील झालेली घटना अत्यंत वाईट असून आपणास झालेले दु:ख हे अपरिमित आहे. परमेश्वर आपल्याला झालेल्या दुःखातून सावरण्याची शाक्ति , तसेच स्व.स्वरा जनार्धन चांदेकर हिच्या मृतात्म्यास लाभो , ही ईश्वरचरणी प्रार्थना ! !

आपल्याला झालेल्या दुःखात आम्ही वडगाव मावळ बार असोसिएशनचे सर्व सदस्य आपले दुःखात सहभागी आहोत.
तसेच सदरील गुन्यातील आरोपी याचे वकीलपञ हे देखील वडगाव मावळ मधील कोणतेही वकील घेणार नाही , आसा ठराव आज रोजीचे एकमताने मंजूर केलेला आहे.
स्थळ :वडगाव मावळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!