ताज्या घडामोडी

राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा..

३ फेब्रुवारी हा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही का ?

Spread the love

राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा..

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ०३ जानेवारी.

‘राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते. ३ फेब्रुवारी हा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे. पण सर्व जाती-धर्माँनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे.

मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. ‘मरावे परि क्रांतिरूपे उरावे’ अशी उक्ती आहे ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. त्यानिमित्त चिंचवड येथील दत्ता माकर, रेखा माकर, सनी माकर तसेच; समाज बांधवानी वाल्हेकरवाडी येथे राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा केला.

अशा थोर क्रांतिकारांच्या आठवणींना उजाळा देत तरुणांमध्ये क्रांतिकारांविषयी ज्योत सदैव ज्वलंत राहावी, याकरिता दत्ता माकर यांनी हे पोवाडा सादर करून त्यांना अभिवादन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!