ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे येथील खिंडीमध्ये काल दिनांक 23 रोजी सालाबाद प्रमाणे हजरत गारपीरशाहवली बाबा यांचा उरूस उत्साहात साजरा.

हजारो भाविक भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ.

Spread the love

तळेगाव दाभाडे येथील खिंडीमध्ये  दिनांक 23 रोजी सालाबाद प्रमाणे हजरत गारपीरशाहवली बाबा यांचा उरूस उत्साहात साजरा.Celebration of Urus of Hazrat Garpirshahvali Baba in Khindi at Talegaon Dabhade on 23rd like Salabad.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. २४ मार्च.

 

तळेगाव दाभाडे येथील, दरवर्षीप्रमाणे खिंडीतील मुजावर बाबा यांनी त्यांच्या राहत्या घरापासून संदल काढला होता, या संदल मध्ये वाजंत्री च्या तालामध्ये दर्ग्यापर्यंत संदल नेण्यात आला. व विधिवत पूजा करून, साडेसात वाजता बाबांना संदल चढवुन, बाबांना चांदीचा ताज ( मुकुट ) परिधान करण्यात आला. शेरा घालण्यात आला.  मोगऱ्या व गुलाबांच्या फुलांची उधळण  करण्यात आली, गुलाब पाण्याचा शिडकाव करण्यात आला व लोबाणच्या धुराणे प्रसन्न वातावरण झाले होते. व संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी मंडप टाकून, आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.

नंतर कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता.  हजारो हिंदू मुस्लिम नागरिक बंधू भगिनींनी दर्ग्यातील बाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला व तेथे प्रसादाचे वाटप करण्यात आले.संदल झाल्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला.हजारो भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.

पाहूयात हा व्हिडिओ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia