आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

*शिंदे गटाचे आमदार कल्याणकर विरोधात पक्षातील शिवसैनिकांचा नाराजीचा उद्रेक, मतदारातूनही नाराजीचा सूर.*

Spread the love

नांदेड-( सखाराम कुलकर्णी) नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आ. बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीकता साधून मतदार संघात १६५० कोटीचा निधी आणला. पण निधीतील कामे शिवसैनिकांना न देता टक्केवारीवर ठेकेदाराला दिल्यामुळे शिंदे गटाचे महानगराध्यक्ष अशोक उमरेकर व दक्षिणचे शहराध्यक्ष तुळजेस यादव यांनी बैठक घेऊन आ. कल्याणकर विरुद्ध नाराजी व्यक्त करून शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला.

नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर व शिवसेना (शिंदे) जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर हे विकास निधी आणतात. पण या निधीचा उपयोग शिवसैनिकांना मोठे करण्यास उपयोगात आणत नसून टक्केवारीवर दुसऱ्या गुत्तेदारांना दिली जातात. आ. बालाजी कल्याणकर यांना २०१९ मध्ये विधानसभेचे तिकीट मिळाले होते व ते शिवसैनिकांच्या पाठबळामुळेच निवडून आले. नंतर ते याच शिवसैकांना विसरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याशी जवळीकता साधून निधी आणण्यास सुरुवात केली. ठाकरे सरकार गेल्यावर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले. नंतर आ. कल्याणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीकता साधून १६५० कोटीचा निधी विविध कामासाठी आणला. पण आमदार व जिल्हाप्रमुख ही कामे शिवसैनिकांना देत नाहीत व ते मनमानी करतात असा आरोप शिवसैनिक अशोक उमरेकर व तुळजेश यादव यांनी विश्राम गृहात घेतलेल्या बैठकीत केला. मतदारातूनही आ. कल्याणकर बद्दल नाराजीचा सूरव्यक्तहोतआहे. कल्याणकर यांना वाटते शिवसेना माझीच आहे. पक्ष बळकट करण्यासाठी शिवसैनिकही बळकट करावे लागते तर आमदार कल्याणकर शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दुसऱ्या ठेकेदारांना तसेच काँग्रेसच्या ठेकेदारांना टक्केवारीवर काम देतात असा आरोप या बैठकीत करण्यात आला. गेली २५ ते ३० वर्षापासून आम्ही शिवसैनिक शिवसेनेचे काम करत आहोत. दहा वर्षापासून शिवसेना युतीची सत्ता असूनही शिवसैनिकांची जिल्हास्तरीय समिती व कमिटीवर शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आली नाही .याच बैठकीत आमदारावर नाराजीचा आरोप करत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही आरोप करून पालकमंत्री हाटाव हा सूर या बैठकीत निघाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!