ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणा-यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – मनसे

Spread the love

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत व मराठ्यांची अस्मिता आहे. त्यांचा अपमान हा समस्त मराठ्यांचा अपमान आहे.महाराज्यांच्या बाबतीत घडलेली ही घटना अतिशय निर्दनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी लोणावळा शहर मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


बेंगळुरू, कर्नाटक येथील सदाशिवनगरात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शाई फेकून विटंबना करून त्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल केला गेला होता. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्याने देशवासीयांच्या भावना दुखावून लोकांना भडकवणाऱ्या त्या विकृत व्यक्ती विरोधात तसेच  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून अशा छोट्या गोष्टींसाठी दगडफेक करणे चुकीचे असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी संतापजनक वक्तव्य करून समाज्यात तेढ निर्माण करून सार्वजनिकरित्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या विरोधात आपल्या पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर तर्फे पोलीस निरीक्षक लोणावळा शहर व ग्रामीण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी सुशील पायगुडे, मंगेश खराडे, अनिल कडू, योगेश हुलावळे, गणेश आहेर, संतोष खराडे, संदिप पोटफोडे, अनंता तिकोने, अमित भोसले, अमित बोरकर, अक्षय जाचक, राजू म्हम्मद शेख आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!