ताज्या घडामोडी

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आशा स्वयंसेविका महिलांचा सत्कार..

युवा नेते राहुल पवार, शीतल पवार यांचे रूपीनगर येथील जनसपंर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आशा स्वयंसेविका महिलांचा सत्कार

युवा नेते राहुल पवार, शीतल पवार यांचे रूपीनगर येथील जनसपंर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन..

आवाज न्यूज पिंपरी प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते राहुल पवार आणि पिंपरी चिंचवड शहराच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा शीतल पवार यांनी रूपीनगर प्रभाग क्रमांक १ मधील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आशा स्वयंसेविका महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी उपस्थितांचे आभार मानत राहुल पवार यांनी आशा स्वयंसेविकांच्या अडचणींसाठी आपण नेहमीच कटिबद्ध असून अडचणींवेळी घराची दारे नेहमीच खुली असतील असे म्हंटले.शहर उपाध्यक्ष शीतल पवार म्हणाल्या की,अजित दादांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा अशी संकल्पना मनात आली.त्याप्रमाणे रात्रंदिवस आपल्यासाठी झटणाऱ्या आशा स्वयंसेविकांसाठी उपक्रम राबवून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शाल, श्रीफळ व वृक्षरोप देऊन उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता आल्हाट,सारिका ढमे,तुषार देवकाते,अनिकेत गडप्पा,शनिता पवार,दीप्ती सूर्यवंशी,रेवती उत्तेकर,अनुज देशमुख,ऋषभ भातुसे,सागर पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!