युवकांनी सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे – डॉ. ज्योतिराम मोरे
लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी.एन. पुरंदरे कला, श्रीमती एस.जी.जी.वाणिज्य व श्रीमती एस.ए. एम.विज्ञान महाविद्यालय लोणावळा, राष्ट्रीय योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. या वेळी ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यासमंडळचे अध्यक्ष डॉ. ज्योतिराम मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
मोरे आपल्या जीवनातील उदाहरणे सांगून भाषणात पुढे म्हणाले , ” आपल्या कार्याचा समाजासाठी काही उपयोग झाला पाहिजे ,समाज कार्यात पुढे येणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन, वाचन करणे, नवीन छंद जोपासणे, इतरांचे म्हणणे ऐकून घेणे, निर्णय ठाम घेणे, अपयशाची भीती न बाळगणे , असे अनेक व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे पैलू स्वयंसेवक आणि उपस्थितास सांगितले , पर्यावरण, भूगोल, यांचा देखील व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होतो हे सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एन.पवार यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये राष्ट्रीय सेवा योजने मुळेच आम्ही घडलो, हुंडा बंदी, आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचे महत्त्व सांगितले, यावेळी महाविद्यालयचे उपप्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.सविता पाटोळे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावित व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.पवन शिनगारे, तर प्रमुख वक्ते यांची ओळख प्रा.धनराज पाटील यांनी केली ,कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.निलेश काळे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



