आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*लिनेस क्लब सोलापूर दृष्टीच्या अध्यक्षपदी सौ.प्रविणा सोलंकी यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड*.

*प्रविणा सोलंकी यांची अध्यक्ष पदाची हॅटट्रिक*

Spread the love

सोलापूर:- लिनेस क्लब सोलापूर दृष्टी च्या नविन वर्षाचा 2024 – 2025 पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. *या कार्यक्रमास पाखर संकुल संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी ताई बुवा यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.

सर्व प्रथम दिप प्रज्वलन करून गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे शुभांगी ताई आणि नूतन अध्यक्षा सौ. प्रविणा सोलंकी यांचा मोठ्या हर्ष उल्हासाने सत्कार करण्यात आला पाखर संकुल संस्थेला दृष्टी लिनेस क्लब तर्फे 22 लिटरचा हाॅकिन्स कंपनीचा कुकर भेट‌ देण्यात आला. दृष्टी क्लबच्या सर्व सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. नुतन अध्यक्ष सौ. प्रविणा सोलंकी यांनी आपल्या मनोगतात जिवदया आणि सामाजिक कार्य करणे हे आपल्या क्लबचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले. कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांचे गुलाबाचे फुल व नॅपकिन देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास श्रीमती पद्मजा कुलकर्णी, सौ.अंजू मालू, सौ. रंजना पाटील, उपाध्यक्ष सुजाता उस्तुर्गे, सेक्रेटरी निर्मला मेहता, ट्रेजरर लक्ष्मी पाटील, मिनल जैन, ढोले मॅडम, वसुंधरा शर्मा, राजश्री चोरमुले, मिनाक्षी अंजनाळकर, तुलसी भिमनपल्ली, शुभांगी पुजारी, माधुरी आवटे, त्रिशला पूनमिया, द्राक्षायनी चेंडके, माधुरी चव्हाण, जयश्री भोसले, ऐश्वर्या कस्तुरे, मिनाक्षी पाचकवडे, सुरेखा गंभीरे, निशा डेकाटे, सौ.झुंजे इतर सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला मेहता व आभार प्रदर्शन लक्ष्मी पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!