तळेगावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकडआरती सोहळा
तळेगाव दाभाडे : येथील नीलकंठ नगरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा काकड आरती सोहळा भक्तीमय वातावरणात महिनाभर सुरू राहणार आहे.
येथे मावळ तालुक्यातील व महाराष्ट्रातील दानशूर भाविकांच्या मदतीच्या सहाय्याने भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिरामध्ये वर्षभर सकाळ व संध्याकाळ आरती तसेच आषाढी एकादशीला व कृष्ण जन्माष्टमी ला सांप्रदायिक सोहळा केला जातो.
या मंदिरातील सर्वात महत्वाचा सांप्रदायिक सोहळा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेनंतर महिनाभर चालणारी काकड आरती. यानिमित्ताने पांडुरंगाची सेवा केली जाते .दररोज पहाटे 5 पासून ते सकाळी 7.30 पर्यंत सोहळा साजरा करण्यात येतो. गेल्या 7 वर्षात तालुक्यातील/जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर येऊन आरतीचा मान स्वीकारीत असतात.

यावर्षी देखील 21ऑक्टोबर पासून सोहोळा सुरू झाला असून समाप्ती 20 नोव्हेंबर रोजी काल्याचे किर्तनाने होणार आहे.
मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यापासून आजतागायत मंदिरातील सेविका रामेश्वरी माऊली कुडाळकर, लता कुडाळकर, सिंधु नीलकंठ,मल्हारी नीलकंठ, कुमारी संगीता लाखे, अर्चना जावळेकर,पुष्पा कुडाळकर, अल्का लाखे, विनायक कुडाळकरभक्ती भावाने व निस्पृहपणे पांडुरंगाची सेवा बजावीत आहेत.
कै.अंकुश रामा जावळेकर व कै. ज्ञानेश्वर माऊली कुडाळकर यांनीही ही सेवा पूर्वी बजावली आहे.या सर्व मंदिरातील सेवकांना काकड आरती कशी करावी याचे प्रशिक्षण कै. हभप कै. भाऊ पानसरे बाबा यांनी दिले.



