ताज्या घडामोडी
लोहगड येथे तळेगाव येथील फ्रेंड्स क्लब मित्र मंडळातर्फे महादेव मंदिराची साफसफाई..
मंदिरा समोरील ध्वज स्तंभावर भगवा ध्वज फडकविण्यात आला.
लोहगड येथे तळेगाव येथील फ्रेंड्स क्लब मित्र मंडळातर्फे महादेव मंदिराची साफसफाई..
आवाज न्यूज प्रतिनिधी तळेगाव दाभाडे १ ऑगस्ट.
सालाबाद प्रमाणे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त किल्ले लोहगड येथे तळेगाव येथील फ्रेंड्स क्लब मित्र मंडळातर्फे महादेव मंदिराची साफसफाई, दुग्धाभिषेक करण्यात आली तसेच मंदिरा समोरील ध्वज स्तंभावर भगवा ध्वज फडकविण्यात आला.
यावेळी मंडळाचे सभासद संतोष अण्णा हजारे, शुभम खोमणे आणि पृथ्वीराज जगताप, विशाल मुरकुटे, अक्षय निंबळे, सुशील मंदिरकर, शुभम पाटील, विशाल शिंदे, मुज्जफर मुल्ला, शरद लहाने, स्वप्नील हांडे, आदित्य कुंभार, विशाल पवार, ओम मांजरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



