आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील गोंधळ: रुग्णांना होणारा मनस्ताप थांबणार कधी?
भरारी न्युज... अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, जो आशिया खंडातील पहिल्या ग्रामीण रुग्णालयांपैकी एक आहे, सध्या रुग्णांच्या असुविधेमुळे चर्चेत आहे. बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी केसपेपर काढण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे. काउंटर कमी, गर्दी जास्त रुग्णालयात एकूण आठ काउंटर असताना केवळ सहा काउंटर कार्यरत असल्याने बाहेर मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत आहे. रुग्णांना आपला नंबर लागण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे, त्यामुळे अनेक वृद्ध आणि गंभीर रुग्ण अडचणीत सापडत आहेत. ओळखीच्या आधारावर सर्रास पक्षपात? रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांकडून ओळखीच्या लोकांना थेट आतून केसपेपर देण्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, सामान्य रुग्णांना रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. हा पक्षपाती व्यवहार गरजू रुग्णांवर अन्याय करणारा असून, त्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालावे रुग्णालय प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेतली पाहिजे. धपाटे साहेबांसह संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून सर्व रुग्णांना समान सुविधा मिळू शकतील. भरारी न्यूजसाठी – उत्तरेश्वर शिंदे, अंबाजोगाई



