आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय
आमदार नमिता मुंदडा केज उपजिल्हा रुग्णालयाकडे लक्ष कधी देणार. एक महिन्यापासून सोनोग्राफी केंद्र बंद.
केज प्रतिनिधी. केज उपजिल्हा रुग्णालयातील गेली एक महिन्यापासून सोनोग्राफी मशीन बंद आहे याकडे नमिता मुंदडा यांना लक्ष देण्याला वेळच नाही असे दिसत आहे ग्रामीण भागातील लोक या दवाखान्यामध्ये जास्त येतात परंतु सध्या या दवाखान्याची अशी अवस्था झाली आहे केज तालुक्यातील या उपजिल्हा रुग्णालयामधील सोनोग्राफी मशीन जर बंद असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करायच केज उपजिल्हा रुग्णालयामधील सोनोग्राफी मशीन बंद असेल तर खूप आश्चर्य करण्याची बाब आहे मशीन डॉक्टरांनीच जाणून बुजून बंद ठेवली आहे केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे डॉक्टर ड्युटी करतात त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच डॉक्टरांकडे सोनोग्राफी मशीन आहे त्यामुळे तर पेशंट स्वतःच्या दवाखान्यात यावेत म्हणून तर ही उपजिल्हा रुग्णालय केज येथील मशीन बंद ठेवली नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना उपस्थित होतो आहे केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा या सातत्याने स्वतःला लोकप्रिय आमदार समजतात तर त्यांनी याही प्रश्नाकडे लक्ष देणार आमची दवाखान्यांमध्ये माणस आहेत पेशंटची देखभाल करायला असा घवगाव करणाऱ्या आमदार नमिता मुंदडा यांचे केज उपजिल्हा रुग्णालयावरील लक्ष कमी झाले आहे असे दिसत आहे दवाखान्याला निधी आणल्यानंतर प्रसिद्धी करणाऱ्या आमदार नमिता मुंदडा केज उपजिल्हा रुग्णालय येथील एक महिन्यापासून सोनोग्राफी केंद्र बंद आहे याकडे लक्ष देतील का




