आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीची सत्र न्यायालयात जामिनीसाठी धाव – अँड. श्रीनिवास कटकुर*

Spread the love

सोलापुर -दत्तनगर झोपडपट्टी, सोलापूर येथे एक पीडित विधवा महिला वय -40 वर्ष ही घरासमोर राहणाऱ्या जवळचे नातेवाईकयांचे छळामुळे व दिलेले त्रासामुळे त्या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली, त्यामुळे आरोपी तुळजाराम आत्रम वय 28 वर्ष रा दत्त नगर सोलापुर यांचे विरुध्द भारतीय दंड विधानसहिता कलम 306 अंतर्गत (Abetment of Suicide ) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबधित जेलरोड पोलीस स्टेशनमध्पे आरोपी आत्रम विरुद्ध गुन्हा दाखल झाला

आरोपीस अटक करुन न्यायालयीन कोठडीत रवानगी करणेत आले व या प्रकरणी आरोपीस विनाकारण सदर केसमध्ये गोवण्यात आले व आरोपी याचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही यासाठी आरोपीच्या वतीने अँड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम 439 अन्वये आरोपीस जामीनवर मुक्तता होणेकामी सोलापुर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला व या कामी सदर जामीन अर्जावर सुनावणीसाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या तपास अधिकारी व सरकारी वकील यांना म्हणणे मांडणेसाठी व सुनावणीसाठी पुढिल तारीख नेमण्यात आलेली आहे.

*आरोपीचेवतीने अँड. श्रीनिवास कटकुर व अँड.किरण कटकुर*
*व अँड. आकाश आयंची हे काम पाहत आहेत*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!