स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्ताने कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतवतीने दहावीच्या विद्यार्थीनीचा सत्कार..
कुसगाव बुद्रूक या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीत ९४ टक्के गुण मिळविणारी सई आनंद गावडे या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.तसेच तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्ताने कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतवतीने दहावीच्या विद्यार्थीनीचा सत्कार..
आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.२१(प्रतिनिधी )
कुसगाव बुद्रूक या तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीत ९४ टक्के गुण मिळविणारी सई आनंद गावडे या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.तसेच तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वळकाईवाडी , जिल्हा परिषद शाळा , क्रांतीनगर अंगणवाडी येथे गुणवंत विद्यार्यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
कुसगाव बुद्रूक च्या कार्यक्षम सरपंच सौ.आश्विनीताई ज्ञानेश्वर गुंड यांचेतर्फे हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. स्वतः ध्वजारोहण करण्याचा मान असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा आगळावेगळा निर्णय घेतला.
यावर्षी दहावी व बारावी मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना झेंडा फडकवण्याचा मान देऊन ग्रामपंचायतीने एक आपलं वेगळेपण सिद्ध केले . यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच व आजी माजी सदय्य यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय येथे कु. सई आनंद गावडे , जिल्हा परिषद शाळा कुसगाव बुद्रुक येथे कु. तृप्ती किशोर परदेशी, जिल्हा परिषद शाळा ओळकाईवाडी येथे कु. साहिल सुधीर मुळीक, क्रांतीनंतर अंगणवाडी येथे कु. दक्ष पाटील अशा एकूण चार ठिकाणी चार विद्यार्थ्यांनी झेंडावंदन केले.
हा आगळा वेगळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून यशस्वी व्हावे , अशी प्रेरणा देणे हा उद्देश होता. यासाठी सरपंच सौ अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच श्री सूरज दत्ता केदारी, सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या वर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी संपूर्ण गावात , वाड्या , वस्तीवर सुमारे २००० झेंडे वाटप करण्यात आले होते .



