वडगाव मावळ पोलीस स्टेशन हददीत बिल्डींग मटेरीयल चोरी करणारी टोळी जेरबंद..
वडगाव मावळ पोलीस स्टेशन हददीत बिल्डींग मटेरीयल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात वडगाव मावळ पोलीस स्टेशन तपास पथकाला आले यश..
आवाज न्यूज वडगाव मावळ ३० जुलै : पोलीस स्टेशन हददीत नाईकनवरे बिल्ड कॉन प्रा.लि चे प्रोजेक्ट कुटुब इगल नेस्ट सर्वे न १२६ / १२७ वडगाव ढोरे फॉर्म रोड येथील साईडवरून जग्वार कंपनीचे बँडेड कॉक, शॉवर, अॅगल टॉप चोरी सुमारे १,४७,९४६/- रु किमतीचा माल चोरी गेला होता याबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन ला गुरन १५२/ २०२२ भादविक ४५४, ४५७,३८० गुन्हा दाखल आहे.
वडगाव मावळ, पोलीस स्टेशन विलास भोसले पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनखाली सहा फौजदार सुनिल जावळे, पोलीस अमलदार श्रीशैल कंटोळी, मनोज कदम, संजय सुपे अमोल तावरे यांनी सदर गुन्हयाचा तपास करून गुप्त बातमीदार तांत्रिक पध्दतीने तपास करून गेल्या मालाचा शोध घेवुन गुन्हयात चोरीस गेलेले जग्वार कंपनीचे ब्रँडेड कॉक शॉवर अँगल टॉप कव्हर बोरी सुमारे १,४७,९४६/ हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्हयात १) हेमंत कुमार नरोत्तम बेहरा वय ३३ वर्षे २) नरोत्तम नारायण स्वाईन वय २८ वर्षे ३) महेश अंतराम नायक वय २१ वर्षे ४) गुलाब दास मानिकपुरी वय २१ वर्षे सर्व रा. नाईक नवरे बिल्डकॉन प्रा.लि. कंपनी मुळ रा. आसाम यांना दि.२९/७/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीं कडुन चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कामगिरी अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण ,मितेश पटटे अपर पोलीस अधिक्षक सो पुणे विभाग,भाउसाहेब ढोले सो उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली विलास भोसले पोलीस निरीक्षक वडगाव मावळ पोलीस स्टेशन, श्रीमती शिला खोत पोलीस उपनिरीक्षक, सुनिल जावळे सहा फौजदार, कैलास कदम सहा. फौजदार, पोलीस अमलदार, श्रीशैल कंटोळी, . मनोज कदम. सचिन देशमुख . संजय सुपे,. अमोल तावरे, चेतन कुमार गणपत होले यांनी तपास करून वरील प्रमाणे माल हस्तगत करून आरोपीना गजाआड केले.पुढील तपास पोउपनिरी श्रीमती शिला खोत या करीत आहेत.



