कौटुंबिक वादाचा राग मनात धरून धारदार कोयत्याने, पत्नीच्या डोक्यात गंभीर वार करून केला निर्घृण खून..
कामशेत पोलीस ठाणे येथे, गुन्हा रजिस्टर नंबर ०३/२०२३ भा द वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला असून, गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली..
कौटुंबिक वादावरून राग मनात धरून धारदार कोयत्याने, पत्नीच्या डोक्यात गंभीर वार करून केला खून..
आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ९ जानेवारी, २०२३.
कामशेत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ८/०१/२०२२ रोजी २१:०० वा चे सु कामशेत शहर येथील रॉयल चायनीज चे मागे राहते घरी बाई नामे – मयुरी दशरथ शिंदे वय ३८ वर्ष हीचा तिचा पती दशरथ विठ्ठल शिंदे वय ४३ वर्ष याने कौटुंबिक वाद कारणावरून राग मनात धरून पत्नी मयुरी शिंदे हिचा पती दशरथ शिंदे याने धारदार कोयत्याने डोक्यात गंभीर वार करून खून केला आहे.


तात्काळ कामशेत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ०३/२०२३ भा द वि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपी यास अटक करण्यात आली असून त्याची दिनांक १३/०१/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मा. न्यायालयाने दिली आहे.
घटनास्थळी सत्यसाई कार्तिक मा सहा पोलीस अधीक्षक सो, लोणावळा विभाग लोणावळा , संजय जगताप सो, पोलीस निरीक्षक, सपोनि आकाश पवार सो, पोसइ शुभम चव्हाण सो, कामशेत पो स्टे यांनी भेट दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. आकाश पवार हे करीत आहेत.




