पेन्शनर धारकांना लवकरच गोड बातमी मिळणार… कमांडर अशोकराव राऊत.
*शिर्डी येथे आयोजित मेळावा उत्साहात संपन्न*

अहमदनगर:- पेन्शनर धारकांना लवकरच गोड बातमी मिळनार अशी माहिती.कमांडर अशोकराव राऊत. दि.२१/२/२०२४ रोजी शिर्डी जि.अहमदनगर येथे ईपीएस ९५ पेन्शनर मेळाव्यास मार्गदर्शन करताना दिली .राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी दिल्ली येथे श्रम मंत्री,श्रम सचिव आणि भविष्य निधी अतिरिक्त आयुक्त, मुख्य आयुक्त यांचे समवेत झालेल्या बैठकींची सविस्तर माहिती देवून सकारात्मक निर्णय होऊन लवकरात लवकर मागणी मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती प्रयत्नशील आहे.त्यामुळे या महिना अखेरीस आपणास निश्चित चांगली बातमी मिळेल असे जाहीर केले.
पेन्शन वाढ मिळण्यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न केले असून आता जबाबदारी सरकारची आहे. आपण मागे हटणार नाही.सर्वांनी एकजुटीने काम करावे लागेल असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मार्गदर्शन केले व मी सतत आपले बरोबर आहे व पुढील काळात आपले मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
मेळाव्याचे प्रास्ताविक पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी करताना डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत दिल्ली येथे झालेल्या आंदोलनाची माहिती देवून कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने सुरू असुन निश्चित यश मिळेल.
याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई आरस, सचिव सौ.सरिता नारखेडे, महाराष्ट्र उपाध्यक्षा आशाताई शिंदे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव यांनी केले.जिल्हध्यक्ष संपतराव समिंदर, महिला आघाडी उपाध्यक्षा आशाताई शिंदे, तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, अशोक देशमुख,वाळके अप्पा, दशरथ पवार सर, राजुस्कर, आयुबभाई शेख, साहेबराव वाघ, चिंतामणी , रायभान तुपे, सुलेमान शेख यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला.

मेळावा यशस्वीतेसाठी दशरथ पवार सर, सुभाष आरसुळे,संपत शेळके, पुंजाहरी कोते, भाऊसाहेब साबळे, भागवत खंडीझोड, गंगाधर तुरकणे, सुरेश कटारिया, शिवाजी गिरी, शिवनाथ सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.



