आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी स्वीकारला   अधिकृत पदभार …..!

Spread the love

सोलापूर २१ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे नूतन शहराध्यक्ष  सुधीर खरटमल यांनी  दिनांक 21-02-2024 रोजी सकाळी 10:30 वाजता मावळते अध्यक्ष तथा नूतन प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांच्या कडून पदभार स्वीकारला . या पदग्रहण कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे, नूतन कार्याध्यक्ष माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक पीर अहमद शेख, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष वारिस कुडले उपस्थित होते.

यावेळी मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पुष्गुच्छ देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व तसेच पक्षाचे आत्तापर्यंत च्या कामाचे अहवाल सुपूर्द केले.
यावेळी महेश कोठे म्हणाले की नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना शहराध्यक्ष पदाचा मोठा अनुभव असून युवकांची खूप मोठी फळी त्यांच्याबरोबर आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात पक्ष मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. आपण सगळेच स्थानिक नेते त्यांना पडेल ती मदत करण्यास तयार आहे असे सांगितले.
आपल्या भाषणात मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे खूप हे खूप कष्टाळू असून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात देखील सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन ते निश्चितच पक्ष बळकट करतील यात शंका वाटत नाही असे सांगितले.
या सत्काराला उत्तर देताना नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, निरीक्षक शेखर माने यांनी आपल्यावर मोठा विश्वास ठेऊन ही जबाबदारी दिली असून निश्चितच येणाऱ्या वर्षभरात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत आपण जिद्दीने काम करणार असून सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक प्रभागात भेटीगाठी देऊन कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे हेच आमचे उमेदवार असतील व तसेच दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी तौफिक शेख हे इच्छुक असल्याने त्यांना ही संधी मिळाल्यास आपली संपूर्ण ताकद आपण त्यांच्या मागे लागू असे सांगितले. शहर मध्ये विधानसभेसाठी महाविकास आघाडी कडून जो कोणी उमेदवार पक्ष कडून देण्यात येईल आम्ही सगळेच आघाडीच्या धर्म पाळत त्या उमेदवाराला संपूर्ण ताकद लावून निवडून आणण्याकरिता कटिबद्ध आहोत असे सांगितले.
सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की सोलापूर लोकसभेची जागा जरी काँग्रेस साठी असली तरी लोकशाहीत मागणी करायला काही अडचण नाही म्हणून आम्ही सोलापूर लोकसभा लढवण्याकरता शेवटपर्यंत मागणी करणार असून शरद पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी लोकसभेचा उमेदवार म्हणून कामाला लागलो असून त्याच बरोबर पक्ष संघटना ही मजबूत करण्यावर जास्ती भर राहणार आहे असे सांगितले.
यावेळी नूतन कार्याध्यक्ष तौफिक शेख, प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलकर, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष साबीर कुरले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष नुरुद्दिन मुल्ला, झोपडपट्टी सेल अध्यक्ष लक्ष्मण भोसले, शहर सोशल मीडिया प्रभारी लाडजी नदाफ, माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी, प्रा. राहुल बोळकोटे, सुर्यकांत शेरखाने, सुनीलकुमार इंगळे, समर्थ लवटे, व्ही. डी. गायकवाड, बळीराम एडके, सोपान थोरात, अन्वर बागवान, विठ्ठल व्हनमारे, गोविंद कांबळे, शक्ती कटकधोंड, प्रवीण वाडे, रामप्रसाद शागालालू, द्वारकाप्रसाद ताव्निया, अतीक नदाफ, इस्माईल बागवान, मोहीन नदाफ, मनीष गायकवाड, रियाज अत्तर, मुसा अत्तर, रोहित खिलारे, रियाज मोमीन, हबीब मसूद, मल्हार शिंदे, नागराज चिमणे, आदेश गायकवाड, अनिस शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!