दुर्गा झाली गौरी”ने गाजविला सृजन नृत्य महोत्सवाचा ४ था दिवस……
.............सृजननृत्य महोत्सव २०२२ तळेगाव दाभाडे
“दुर्गा झाली गौरी”ने गाजविला सृजन नृत्य महोत्सवाचा ४ था दिवस……
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २८ डिसेंबर.

………….सृजननृत्य महोत्सव २०२२ तळेगाव दाभाडे
कलापिनीच्या कै.शं.वा.परांजपे नाट्यसंकुलात गेले तीन दिवस अतिशय उत्साहात पार पडत असलेल्या सृजन नृत्यालयाच्या महोत्सवात “दुर्गा झाली गौरी” या नृत्य नाट्याने महोत्सवला एक आणखी शिरपेच विराजमान झाला. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सादर झालेल्या या नृत्य नाट्याचे दिग्दर्शन सृजन संस्थेच्या सर्वेसर्वा डॉ. मीनल कुलकर्णी यांनी केले आहे. माधव साखरदांडे लिखित “दुर्गा झाली गौरी” ह्या नाटकाला २०११ साली २५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा कलाकारांना अभिवादन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील सगळया नाट्य संस्थांनी हे नाटक बसवावे व पुनर्जीवित करावे अशी योजना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदने आणली होती.

अभिमानाची गोष्ट अशी की संपूर्ण महाराष्ट्र भरातून फक्त कलापिनी ही एकमेव संस्था आहे जिने या योजनेला प्रतिसाद दिला आणि या नाटकाचे आजवर अनेक प्रयोग केले. १०० हून अधिक कलाकार घेऊन हे नाटक करण्याचं शिवधनुष्य सृजननृत्यालय आणि कलापिनी या दोन्ही संस्थानी मिळून अत्यंत ताकदीने उचलंलय. या नाटकाची अतिशय आकर्षक अशी रंगभूषा अरविंद सूर्य यांनी केली होती. आणि प्रकाशयोजना गजानन वाटाणे यांनी केली होती. या प्रसंगी दोघाचेहीं त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. या नाटकात प्रमुख भूमिकेत अभिज्ञा कुलकर्णी, प्रतीक मेहता, कामिनी जोशी, अर्णव ओक, शरयू पवनीकर,प्रणोती काळे, डॉ.मीनल कुलकर्णी,पूजा कडवे, कौमुदी जोशी, हृतिक पाटील, प्रशांत धुळेकर आणि वेद भालेराव इत्यादी कलाकार होते. इतर फुलं, मधमाश्यांना, मुग्यां इत्यादी भूमिकेत असणाऱ्या बाल कलाकारांनी त्यांच्या हालचाली आणि आकर्षक वेशभूषेनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
या प्रसंगी मा. सुरेश धोत्रे, डॉ. अनंत परांजपे, मा. पूनम शर्मा, श्रीशैल गद्रे आणि जितेंद्र पावगी आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. धनश्री शिंदे हिने तिच्या गोड आवाजात सरस्वती देवीचा श्लोकाचे पठन केले .
गेल्या २७ वर्षांच्या काळात ज्यांच्या सहकार्याने हा प्रवास सुरु झाला त्या वंदनीय ताई आपटे प्रतिष्ठान, कौस्तुभ भेगडे, सावंत, राजेंद्र शहा, अभय ठाकर, प्रिया सप्रे आणि. माधवी मरकळे यांचा सृजन संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. तसेच या महोत्सवात जी तंत्रज्ञ टीम काम करत आहेत ते रवीजी मेघावत, रवीजी पाटील, किशोर कसाबी, हितेश शिंदे, योगेश शिंदे या पडद्यामागच्या कलाकारांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला. कांचन सावंत या प्रसंगी उपस्थित होत्या, त्याने आपले मनोगत व्यक्त करत डॉ. मीनल कुलकर्णी यांचे कौतुक केले. याप्रसंगी वास्तू विशारद जितेंद्र पावगी आणि पूनम शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अखिल भारतीय नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष मा. सुरेश धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत “दुर्गा झाली गौरी” या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग होण्यासाठी नाट्यपरिषद सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे निवेदन विद्या भोपळे यांनी केले.
या प्रसंगी महर्षी कर्वे आश्रमशाळा ,कामशेत या ठिकाणचे सुमारे ९० विद्यार्थी आपल्या शिक्षकां समवेत नाटक पाहण्यास उपस्थित होते. त्यांनी यांच्यावतीने डॉ. मीनल कुलकर्णी यांचा सत्कार केला.
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात महोत्सवाचा चौथा दिवस पार पडला. उद्या २८ तारखेला “भाग्य देखिले तुका” या नृत्य नाट्याने महोत्सवाचा समारोप होणार आहे तरी रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे व नवीन नृत्यनाट्याचा आनंद घेऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन डॉ.मीनल कुलकर्णी यांनी केले.



