ताज्या घडामोडी

बापट कुटुंबियांकडून नर्सिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत

Spread the love

तळेगाव : तळेगावातील भाऊसाहेब सरदेसाई यांच्या समवेत सातत्याने नेत्र रुग्णसेवा देणार्‍या परांजपे यांची सुकन्या सुलोचना बापट व त्यांच्या परिवाराकडून नर्सिंग स्कूल मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष शैलेश शहा व उपाध्यक्ष गणेश खांडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

तसेच एप्रिल महिन्यात या मदतीत आणखीन पाच लाखांची भर घालण्यात येईल असेही तळेगाव जनरल हॉस्पिटल च्या कार्यकारणीच्या सभेत जाहिर करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष शैलेश शहा, उपाध्यक्ष गणेश खांडगे, खजिनदार विनायक अभ्यंकर, चंद्रभान खळदे, डॉ. किरण देशमुख, डॉ. शाळीग्राम भंडारी, संजय साने हे कार्यकारणी सभासद उपस्थित होते.

या आर्थिक मदती विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईस्थित बापट परिवाराचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!