ताज्या घडामोडी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव मावळ तालुका स्तरीय स्पर्धा

पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या वतीने आमदार प्रकाश देवळे विद्यालय व शारदाश्रम आश्रम शाळा शिरगाव, येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव मावळ तालुका स्तरीय स्पर्धा

आवाज न्यूज: शिरगाव मावळ प्रतिनिधी २९ जुलै,

पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या वतीने आमदार प्रकाश देवळे विद्यालय व शारदाश्रम आश्रम शाळा शिरगाव, येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
तालुकास्तरावर चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा ,प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा उत्स्फूर्तपणे पार पडल्या .सदर तालुकास्तरीय स्पर्धेत इयत्ता पहिली ते आठवीच्या 108 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उद्घाटन माननीय गटविकास अधिकारी तथा प्रशासक, सुधीर भागवत साहेब ,माननीय गटशिक्षणाधिकारी   बाळासाहेब राक्षे ,मा. विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज साहेब , कृष्णा भांगरे  केंद्रप्रमुख  विजय मारणे सर,शोभा गुप्ते मॅडम ,  तातेसर , मिनीनाथ खुरसुले सर आणि सर्व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

तसेच तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन आमदार प्रकाश देवळे विद्यालय व शारदा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक . विजय लोखंडे सर व संतोष चव्हाण सर व शिक्षकवृंद यांनी केले .
उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या. भागवत साहेब म्हणाले..स्पर्धा ही स्वतःशी असते . स्पर्धा ही निकोप असावी आणि प्रगतीकडे जाणारी असावी,विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी गुणदर्शन दाखले त्यांच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्यात.. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सम्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

मा . गटशिक्षणाधिकारी. बाळासाहेब राक्षे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . केंद्रप्रमुख. सुहास धस सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले .या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून समग्र शिक्षा अभियानातील विषयसाधनव्यक्ती व विशेष शिक्षक यांनी काम पाहिले .स्पर्धेचे पंच म्हणून माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी कामकाज पाहिले . निकाल संकलन केंद्रप्रमुख संजय ठाकर सर यांनी केले . या कार्यक्रमात धस सर. चौगुले सर यांनी सहकार्य केले .
कार्यक्रमास सर्व केंद्रप्रमुख , शिक्षक , पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता भोई विषयसाधन व्यक्ती यांनी मानले.आभार केंद्रप्रमुख,संतोष कांबळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!