ताज्या घडामोडी

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला

सात टप्प्यात मतदान ; तर 10 मार्चला मतमोजणी

Spread the love

नवी दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक सात टप्प्यांमध्ये होणार आहे. उत्तर प्रदेशसह उर्वरित चार राज्यांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये एकूण 403 आमदार आहेत. येथे सात टप्प्यात मतदान होईल. त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 10 फेब्रुवारी रोजी ते शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्च रोजी होणार आहे. पंजाब उत्तराखंड मधील मतदान एका टप्प्यात पूर्ण होईल. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी पत्रकार परिषद घेऊन या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!