ताज्या घडामोडी
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close
आवाज न्यूज: पंढरपूर, प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर.

पंढरपूरजवळ एक फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानं जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तसेच, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना रात्री एक फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानं ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गाडी ज्या कालव्यात कोसळली होती, त्या कालव्यात उतरायला जागा नसल्यानं बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते.
त्यामुळे स्थानिकांनी दोराच्या सहाय्यानं जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कार या खोल कालव्यात पडल्याचं सांगितलं जात आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.