ताज्या घडामोडी

फ्लोरा सिटीत भरदिवसा  बंदुकीचा धाक दाखवून पावणे अकरा लाखांचा ऐवज लंपास.

तळेगाव दाभाडे येथे  भरदिवसा घरात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून पावणे अकरा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

Spread the love

फ्लोरा सिटीत भरदिवसा  बंदुकीचा धाक दाखवून पावणे अकरा लाखांचा ऐवज लंपास.

आवाज न्यूज ; तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, ११ जानेवारी.

तळेगाव दाभाडे येथे  भरदिवसा घरात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून पावणे अकरा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. हा प्रकार मंगळवारी १० ता. दुपारी पावणे दोनच्या सुमारास फ्लोरा सिटी येथे घडली आहे.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलीप चंपालाल मुथा  रा. फ्लोरा सिटी, तळेगाव दाभाडे, यांनी फिर्याद दिली असून पाच अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तळेगावातील किराणा व्यावसायिक असून फिर्यादी हे घरी असताना आरोपी जबरदस्तीने घरात घुसले, घरातल्यांना त्यांनी पिस्तूल व चाकुचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी व घरातील इतरसोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १० लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तळेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मात्र भरदिवसा घरात घुसून अशी लुट झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!