ताज्या घडामोडी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती लोणावळ्यात प्रतिमा पूजन व ओवी गायनाने साजरी

Spread the love

लोणावळा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती भांगरवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रतिमा पूजन व ओवी गायनाने साजरी करण्यात आली. यावेळी मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याबद्दल भाषणे केली. यावेळी मुख्याध्यापिका सौ.निता दिलीप पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिक्षिका ज्योती चव्हाण , रेखा महाडीक, स्वप्ना बागडे, आयेश शेख , शिक्षक संतोष जगताप आदी उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या ओव्या विद्यालयात विद्यार्थी , विद्यार्थीनी यांना ऐकविण्यात आल्या.

सुमारे १६२ विद्यार्थी पटसंख्या या ठिकाणी शाळेत असल्याचे मुख्याध्यापिका सौ.पवार म्हणाल्या . सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक कार्याबद्दल व त्यागाबद्दल विद्यार्थी यांना माहिती असायला हवी. तसेच त्यांनी मुलींना शिक्षण देणे प्रारंभ केल्यामुळे आज मुली शिक्षण घेवून विविध क्षेत्रात मोठ्या पदावर काम करीत आहे,असे त्या म्हणाल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!