आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन सोलापूर तर्फे सर्वधर्मसमभाव रक्षाबंधन साजरा….!

Spread the love

सोलापूर:- राखी पौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे रेल्वे स्टेशन लोहमार्ग पोलीस चौकी तसेच, रेल्वे स्टेशन कुली, पार्सल ऑफिस मधील कर्मचारी, रेल्वे स्टेशन मधील सफाई कामगार, रेल्वे स्टेशन वरील विक्रेते , टी टी पदाधिकारी या सर्वांना राखी बांधून प्रत्येक भावाला ओवाळून रक्षाबंधन साजरे करण्यात आले…

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोहमार्ग वरिष्ठ पोलीस अधिकारी  श्री संतोष गायकवाड सर होते.. सरांनी , राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन मार्फत कुली दादा सफाई कामगार विक्रेते अशा अनेकांना राख्या बांधणार असल्याबद्दल विशेष कौतुकाची थाप मनोगतातून दिली. आणि फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.. रक्षाबंधनानिमित्त उपस्थित सर्व ताईंना कधी कोणतीही अडचण आली तर मदतीसाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा आधारही त्यांनी दिला… संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रांजली मोहीकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रेल्वे स्टेशनवर जे हात दिवसभर प्रवाशांचे सामान डोक्यावर खांद्यावर उचलून खूप कष्ट करत राहतात अशा हातांना परमेश्वरा जवळ बळकटी मागण्याकरता या कुली दादांना राख्या बांधणार असल्याचे त्या म्हणाल्या.. तसेच लोहमार्ग पोलीस अधिकारी व सर्व सहकाऱ्यांतर्फे नेहमीच अडचणीत असलेल्यांना मदत करणाऱ्या या पोलीस दादांच्या हातांनाही राखी बांधण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले… सर्व धर्मातील दादांना रेल्वे स्टेशन पाशी राख्या बांधण्यात आल्या… सर्वधर्मसमभाव हा चांगला संदेश आजच्या या कार्यक्रमातर्फे देण्यात आला…


या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात रेल्वे स्टेशनची निगडित टी टी पदाधिकारी,पार्सल ऑफिस, रेल्वे स्टेशन कुली, सफाई कामगार, विविध विक्रेते अशा सर्वांना राखी बांधून उत्साहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी, श्री संजीव जाधव (लोहमार्गउप पोलीस निरीक्षक ), श्री अमोल जोशी(आर पी एफ उप पोलीस निरीक्षक), श्री जावेद जमादार (टी टी सी पी आय), श्री.राहुल कापुरे(टीटी उपाध्यक्ष) , स्टेशन मास्तर मीना साहेब, किरण पाठक (गुप्त खाते पोलीस निरीक्षक), असलम भाई शेख (वेंडर संघटना अध्यक्ष), राजाभाऊ जाधव (प्रवासी संघटना अध्यक्ष), मयूर भोज (पेपर विक्रेते) यांची प्रमुख उपस्थिती होती..

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रेमचंद मेने, ज्योती मेने (विश्वस्त), वेदांत मोहीकर (विश्वस्त), सुहास भोसले (पदाधिकारी), तसेच सदस्य अनुराधा निकम, राजेश्वर पाटील, विजयकुमार जाधव, रवीखांचचनदानी, रेखा लोणी, संगीता सिडलप्पा, सुवर्णागड्डीमनी, विद्या चौगुले, कु. पूजा चौगुले, कु.तेजस्विनी चौगुले आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाभाऊ जाधव यांनी केले.. तर आभार प्रेमचंद मेने यांनी मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!