आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कामगार शक्ती युनियनतर्फे वृक्षारोपण संपन्न….!

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या132 व्या जयंतीनिमित्त कामगार शक्ती युनियनचे वतीने मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयाच्या कंपाऊंड परिसरात प्रशासनाधिकारी हनुमंत जाधवर यांच्या हस्ते कामगार शक्ती युनियनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी कामगार शक्ती युनियनचे जनरल सेक्रटरी चांगदेव सोनवणे प्रा.शिक्षण मंडळाकडील विभागीय अध्यक्ष तथा माजी चेअरमन भालचंद्र साखरे उपाध्यक्ष केरबा माने,पर्यवेक्षक सुरेश कासार,भगवान मुंडें,ताहिर कारभारी,सारंग अंजीखाने, खजिनदार शिवाजी कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे नागसेन माने,आण्णासाहेब वाघमारे,बापू सातपुते,रसूल तांबोळी आदी उपस्थिति होते.



