आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या सल्लागार पदी ऍड दिलीप जगताप यांची नियुक्ती*

Spread the love

सोलापूर(प्रतिनिधी )सोलापूर डिजिटल पत्रकार संघाची बैठक गुरुवारी सकाळी मुख्य कार्यालय रंगभवन येथे पार पडली सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख,यशवंत पवार ,अक्षय बबलाद, इरफान शेख, सैफन शेख, होते सदर बैठकीत पत्रकारांवर होणारे खोटे गुन्हे बाबत पत्रकारांच्या अडचणीत कायदेशीर मार्गदर्शन तसेच न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी सोलापूर येथील सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी अल्प दरात फी आकारून गोरगरीबाना न्यायालयीन कामकाज करून न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणाऱ्या युवा व अभ्यासू वकील ऍड दिलीप जगताप यांची डिजिटल पत्रकार संघाच्या कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली डिजिटल पत्रकार संघाच्या वतीने दिलीप जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

*पत्रकारांची बाजू न्यायालयात मांडून न्याय मिळवून देऊ*
पत्रकारिता करत असताना पत्रकारांना कायदेशीर ज्ञान असणे आवश्यक असून पत्रकारांवर कधी कधी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जातात अश्या वेळी पत्रकारांची बाजू न्यायालयात समर्थपणे मांडून पत्रकारांचे अडचणी सोडवण्याच्या प्रयत्न करणार असल्याची ऍड दिलीप जगताप यांनी सत्कार प्रसंगी सांगितले यावेळी उजेर इनामदार,इरफान पटेल, उपस्थित लोकप्रधानचे अल्ताफ शेख जनशक्ती न्युजचे इलियास सिद्धीकी,श्रीनिवास बोगा,सद्दाम शेख,अश्फाक शेख,शब्बीर मणियार,इरफान मंगलगिरी,कुणाल धोत्रे,राजेश वडीशेरला,जहुर सय्यद,नबीलाल शेख,मोहसीन बागवान, गफूर सौदागर,अकबर बागवान,अजमेर शेख,सिद्धलिंग नवले,वैभव जावळे,योगीनाथ स्वामी,अफजल शेख,नानासाहेब ननवरे, वाहिद शेख,इरफान शेख,सोहेल शाहनूरकर,आदी पत्रकार आणि उपसंपादक आणि संपादक बैठकीला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!