ताज्या घडामोडी

महात्मा गांधी जयंती निमित्त तळेगाव दाभाडे शहरातील गांधी कुटुंबाने केली अनोखी सजावट

Spread the love

तळेगाव दाभाडे : स्टेशन परिसरात म्हाडा कॉलनीतील रहिवासी भाविन रमेशभाई गांधी यांच्या मुलींनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त खादीला चालना देणाऱ्या कलाकृतीतून सजावट करत अनोख्या पद्धतीने गांधी जयंती साजरी केली. कु. निधी (वय १४) व कु शितल (वय १२) यांनी आपल्या कल्पकतेतून सजावट केली असून त्यांची आई मीना गांधी यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

खादी बनवण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य व अवजारे आणि चरखा चालवताना बापुजी यांच्या पुठ्या पासून बनवलेल्या कलात्मक कलाकृतीतून मानवंदना दिली. महात्मा गांधी यांच्या जिवन पटात, आंतर्देशीय खादीला चालना देण्यासाठी चरखा चालवला या देशभक्तीला प्रेरीत होऊन महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी त्यांच्या जिवन पटातील विषयांवर आधारित घरघुती देखावा सजवला असल्याचे निधी व शितल यांनी सांगितले. परिसरातील अनेक नागरिकांनी सजावट पाहण्यासाठी भेट देऊन या दोन्ही मुलींचे तोंड भरुन कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!