*डॉ. प्रवीण गेडाम यांना मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ पदवी प्राप्त*

नांदेड- (सखाराम कुलकर्णी)आयएएस अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी नुकतीच हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली आहे. व आता ते राज्यात परत येऊन राज्याच्या आरोग्य विभागात दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोशल मिडियात पोस्टद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्वप्नपूर्ती हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली. या माध्यामातून त्यांनी जगभरात मित्र केलेत. बरेच वर्ष त्यांनी केंद्र शासनाच्या दिल्ली येथील वेग वेगळ्या विभागात ,रेल्वे बोर्डात कर्तव्य बजावत कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणुन छाप पडली.त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. व आता ते लवकरच कामावर परतत असून महाराष्ट्र शासनात रुजू होण्यास उत्सुक आहेत.
डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच, डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध पदासह शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. असे कर्तव्य दक्ष अधिकारी पुन्हा परत महाराष्ट्र शासनात दाखल होणार असी चर्चा आहे.



