मोदी सरकारने कालच आदेश दिला , आज महाराष्ट्र सरकार दोन्ही रिसाॕर्ट पाडण्याचे आदेश देणार : माजी खासदार किरीट सोमय्या..
लोणावळा हा देशात चिक्की साठी प्रसिद्ध आहे , येथे भाजपचाच नगराध्यक्ष या निवडणुकीत होणार , तो देशात सुशासन राबविण्यासाठी मला निवडुन द्या , असा संकल्प इच्छुकांनी , करायचा आहे !
मोदी सरकारने कालच आदेश दिला , आज महाराष्ट्र सरकार दोन्ही रिसाॕर्ट पाडण्याचे आदेश देणार : माजी खासदार किरीट सोमय्या
आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.२३ प्रतिनिधी
मोदी सरकारने कालच आदेश दिला , आज महाराष्ट्र सरकार दोन्ही रेसाॕर्ट पाडण्याचे आदेश देणार ,हा पैसा कुठून आला. याची चौकशी होणार ! उध्दव ठाकरे यांचा उजवा हात आत गेला आहे , डावा हात ही , तुमच्या लक्षात आले असेलच!आता कुणाचा नंबर आहे !.मविआ सरकारचा कोविड घोटाळा फाईल आज बाहेर येणार ,असा गौप्यस्फोट माजी खासदार किरीट सोमैया यांनी आज लोणावळ्यात केला.
लोणावळा येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात, सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , तसेच माजी परिवहनमंञी अनिल परब यांचेवर आज टीकास्ञ सोडले. काँग्रेस आयच्या २०१४ नंतर टेलेफोन व कोळसा घोटाळा यावर टीका करताना .सोमय्या म्हणाले , निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुद्दा होऊ शकतो , हे कुणाला पटले असते का ? ? काँग्रेस सरकारच्या काळात स्पेक्ट्रम घोटाळा , टेलेफोन घोटाळा , कोळसा घोटाळा यामुळे काळेझालेल्या तोंडाने काँग्रेस मते मागू शकली नाही.
यावेळी .सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री .ठाकरे यांचेवर खरपूस टीका केली.ते म्हणाले , ठाकरे मुख्यमंत्री असताना कुणी त्यांचेविरूध्द बोलले , तर लगेच तुरूंगात टाकत असे. वडाळाच्या एका तीस पस्तीस वयाच्या तरूणाने ठाकरे यांचेवर टीका करणारी पोस्ट टाकली , तर त्याला राञी दोन वाजता घरी गेले, बायको व आईला चाळीतसमोर लाईनीत उभे करून त्याचे मुंडन केले. मालाडच्या एका नेवी अधिका-याने एक व्हाटसॲपला पोस्ट टाकली , त्याला राञी बारानंतर घरी जाऊन मारहाण केली. अशी दहशत , आणि माफीयाराज या राज्यात चालणार नाही.
लोणावळा हा देशात चिक्की साठी प्रसिद्ध आहे , येथे भाजपचाच नगराध्यक्ष या निवडणुकीत होणार , तो देशात सुशासन राबविण्यासाठी मला निवडुन द्या , असा संकल्प इच्छुकांनी , करायचा आहे ! मला नगरसेवक , चेअरमन , मीच होणार असा आहंकार नको .नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव या मागील टर्ममधे नगराध्यक्षा होत्या.पुढील टर्ममधे , त्यापुढे नगराध्यक्षा राहणार आहे.
दोन महिन्यात देवेंद्रजी व एकनाथराव यांचेकडून चक्रे फिरली , आपली सत्ता आणली. पर्यावरण मंञी यांचे काळात स्टुडिओसाठी एक हजार कोटी खर्च झालेल्या फाईली पाहून , लवकरच मुख्यमंत्री , उपमुख्यमंञी यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे,असा गौप्यस्पोट.सोमय्या यांनी केला..]
यावेळी जेष्ठ नेते शामाप्रसाद मुखर्जी व माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दिपप्रज्वलन करून भाजपच्या मेळाव्याचे .सोमय्या यांचेहस्ते उद्घाटन झाले.यावेळी प्रास्ताविक शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांनी केले. ते म्हणाले , प्रधानमंञी नरेँद्रजी मोदी यांनी नुकत्याच पाच घोषणा केल्या. सत्तेवर यायच्या वेळी भ्रष्टाचार व घराणेशाही यावर जोरदार आवाज उठविला.तसेच माजी खासदार श्री.सोमय्या यांनी भ्रष्टाचार नष्ठ करण्यासाठी आनेक संकटे झेलली.त्यांचेवर तीन वेळा हल्ला झाला.
यावेळी मनोगतात माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव म्हणाल्या , ” उपमुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस आणि मंञी सुधीरभाऊ मनगुंटीवार यांचेकडून भाजप सत्तेवर असताना काळात लोणावळा नगरपरिषदेकडे भरघोस निधी आल्याने देशात स्वच्छता अभियानात चारवर्षे क्रमांक मिळविला . सुमारे ५५ कोटी बक्षिस देण्यात आले आहे.
प्रशासकीय काळात प्रशासक सोमनाथ जाधव यांचेकडून सुमारे १३ कोटीचे एफ.डी.तोडून तो रस्त्याच्या कामासाठी मनमानी पणे वापरण्यात आला. याबाबत लवकरच पञव्यवहार करणार असल्याचे श्रीमती जाधव म्हणाल्या .
यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे , भाजप जिल्हाध्यक्ष गणेशातात्या भेगडे , तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , माजी नगरसेवक देविदास कडू , विजय सिनकर , माजी नगरसेविका बिंद्रा गणाञा , माजी जिल्हापरिषद सदस्य दत्ताभाऊ गुंड , भाजप उपाध्यक्ष शकील शेख,महिला शहराध्यक्षा योगिता कोकरे , तसेच असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आभार व मनोगतात माजी राज्यमंञी बाळा भेगडे म्हणाले , लोणावळा शहर हे चिक्की साठी प्रसिद्ध आहे.राज्याचे राजकारण लोणावळ्यापासून वेगळे वळण घेतात. मी आजच शब्द देतो , की यापुढील नगराध्यक्ष भाजपचाच येणार , तसेच आसा राज्यमंञीमंडळाने जनतेमधून नगराध्यक्ष निवडून येणार , हे बील मंजूर केले .
यावेळी काही कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेना माजी शहरप्रमुख , माजी नगरसेवक सुनिल इंगूळकर , व माजी नगरसेविका कांचन गायकवाड , रमेश गायकवाड , सुधीर पारीटे , प्रतिक बोरकर , यांचेसह असंख्य महिला , आणि तरूण कार्यकर्त्यांनी श्री सोमय्या यांचे उपस्थितीत भाजपमधे पक्षप्रवेश केला. भाजप शहर उपाध्यक्ष शौकत शेख यांचे कार्यकर्ते अरबाज शेख , जमील शेख , श्री.सिकीलकर यांनीही पक्षप्रवेश केला. माजी नगरसेवक विशाल पाडाळे , मावळ तालुका कार्याध्यक्ष आर्जून पाठारे , विजय सकट , सुनिल तावरे , समीर इंगळे , हर्षल होगले , अरूण लाड , सुनिल गायकवाड , दिपक काँबळे , माजी नगरसेविका मंदाताई सोनवणे , रचना सिनकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूञसंचालन माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर यांनी केले…



