*लवकरच ईपीएफ 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये होणार वाढ…..मिनिमम पेन्शनवाढी बाबतचा मुद्दा स्टॅंडिंग कमिटी ऑन लेबर च्या समोर प्रभावीपणे व सफलतापूर्वक सादर*
*सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शन वाढ अपडेट बातमी माहिती*

भवानीनगर :- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कमीत कमी 7500 रुपये पेन्शन वाढ + महागाई भत्ता व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणेबाबतची मागणी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष . श्री. कमांडर अशोक राऊत व राष्ट्रीय मुख्य न्यायीक सल्लागार इंजिनियर ॲड. कवीश डांगे यांनी महत्त्वाचे दस्तऐवज, पुरावे, फोटो, पावर पॉइंट स्टॅंडिंग कमिटी पुढे प्रत्यक्ष सादर करून व मौखिक स्वरूपात प्रभावीपणे व सफलतापूर्वक मांडली.
दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय संघर्ष समितीला लोकसभा सचिवालय दिल्ली येथे स्टॅंडिंग कमिटी ऑन लेबर चे अध्यक्ष व कटक ओडिसाचे संसद श्री.भर्तुहरी महताब साहेब यांच्या अध्यक्षते खालील 31 कमिटी खासदार सदस्यांच्या समोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढी बाबतचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे म्हणणे मांडण्यासाठी रितसर पत्र देऊन सविनय निमंत्रण देण्यात आले होते, त्याप्रसंगी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने ईपीएफ 95 पेन्शनवाढी चा मुद्दा प्रभावीपणे व सफलता पूर्वक सादर करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या न्याय मागण्या तातडीने मंजूर व्हाव्यात म्हणून सर्व प्रकारची आंदोलने,चर्चा, भेटीगाठी,पत्रव्यवहार करून व शेवटी थेट पंतप्रधान यांची दोन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सर्व समस्या अवगत करण्यात आल्या होत्या. त्यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून 31 खासदार अंतर्भूत असलेल्या कामगार स्थायी समितीची स्थापना करण्यात आली होती. सदर समितीचे अध्यक्ष म्हणून श्री भर्तुहरी महताब, कटक,ओडिसा यांची नेमणूक करण्यात आली होती. स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी त्यांचे शिष्टमंडळासह एकदा कटक येथे जाऊन व एकदा नवी दिल्ली येथे सदर समितीच्या अध्यक्षांसमवेत दोन वेळा चर्चा देखील केली होती. या समितीमध्ये महाराष्ट्रातून कोल्हापूरचे खासदार डॉक्टर संजय मंडलिक हे एकमेव सदस्य आहेत. त्यांच्याशी देखील संघटनेच्या कोल्हापूर येथील पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे. ज्या प्रकारे 2014 मध्ये न्यूनतम पेन्शन 1000 रुपये करण्यात आली होती, त्याच आधारे आता न्यूनतम पेन्शन रुपये 7500 करून त्यामध्ये महागाई भत्ता देण्यात यावा ही प्रमुख मागणी ईपीएस 95 पेन्शन धारकांची असून ती कशाप्रकारे पूर्ण होऊ शकते याबाबतची सर्व कागदपत्रे यापूर्वीच संघटनेच्या वतीने समितीला सादर करण्यात आली आहेत.
यावेळी स्टैंडिंग कमेटी ऑन लेबरचे अध्यक्ष व सांसद, कटक, ओडिसा .श्री.भर्तृहरि महताब, प्रभारी मुख्य केंद्रीय भविष्य निधी आयुक्त व अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त श्री के एल तनेजा, इंश्योरेंस क्षेत्र/कर्मचारी कल्याण संबंधित अनुभवी माननीया सुश्री प्रीति चंद्रशेखर सचिव, मर्सर कंसल्टिंग (प्रा.) लिमिटेड व EPFO फंडाचे एक्चुअरी श्री जयेश पंडित , प्रिंसिपल, मे. के ए पंडित कंसल्टेंट, राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय सचिव श्री बापूजी पात्रा व ओडिसा प्रांत प्रांतीय सचिव श्री दीपक कुमार साहू सहित ओडिसा तसेच स्टॅंडिंग कमिटीचे सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी कमिटी, अध्यक्ष/सदस्यांना सेवानिवृत्त पेन्शनरच्या मेडिकल सुविधांचा अभाव व अत्यल्प कमी पेन्शन मिळाल्यामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी दयनीय व मरणासन्न अवस्थांमध्ये जीवन जगत असल्याचे तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही ईपीएफ फंडाची जी क्रूर सिस्टीम आहे त्यामुळे उच्च पेन्शन संयुक्त विकल्प फॉर्म भरताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे होणारे हाल, अपेष्टांची, भटकंतीची जाणीव करून दिली. तसेच ईपीएस योजनेमध्ये सरकारचे जे केवळ 1.16% अत्यल्प अंशदान आहे त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली. तसेच यामागे पेन्शनवाढी बाबत नरेंद्र मोदी, पंतप्रधान,भारत सरकार यांची दोन वेळा झालेली भेट व पेन्शन वाढी बाबत त्यांनी दिलेल्या अश्वासनाची माहिती करून दिली व लवकरात लवकर मिनिमम पेन्शन रुपये 7,500/- + महागाई भत्ता व मोफत वैद्यकीय सेवा तसेच जे कर्मचारी पेन्शन मध्ये बसत नसतील त्यांना रुपये 5,000/- सरसकट पेन्शनवाढ देण्याची विनंती केली. याप्रसंगी त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची व्याख्या सांगून वास्तविक वेतनावर कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता सरसकट पेन्शन धारकांना पेन्शन वाढीचा लाभ देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली. स्टॅंडिंग कमिटीच्या अध्यक्ष /सदस्यांनी कमांडर अशोक राऊत साहेबांनी केलेले विवेचन गांभीर्याने ऐकले व समजून घेतले.
आता सर्व सेवानिवृत्त पेन्शन धारकांचे स्टॅंडिंग कमिटी आपला अहवाल केव्हा केंद्र शासनाला सादर करते व केंद्र शासन केव्हा पेन्शन वाढीबाबतचा आदेश काढते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
*प्रकाश ज्ञानदेव शिंदे*
अध्यक्ष, ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती इंदापूर
मु. पो. सणसर, तालुका. इंदापूर,
जि .पुणे
मो. नं. 9657220101



