ताज्या घडामोडी

चिंचवड परिसरातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची अर्थसहाय्य योजना – ज्योती निंबाळकर

Spread the love

चिंचवड : येथील परिसरातील खाजगी शाळेतील दहावी व बारावी मध्ये ८० ते ९० टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने मोफत अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे.

त्यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांनी यासाठीचे फॉर्म भरून देण्याचे आवाहन माऊली सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा व चिंचवड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटिका ज्योती निंबाळकर यांनी केले.

दहावी मध्ये ८० ते ९० टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना १०हजार रुपये ९० टक्के पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना १५ हजार रुपये तसेच बारावीमध्ये ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना १५ हजार रुपये अर्थसहाय्य पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे ज्योती निंबाळकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!