ताज्या घडामोडी

छञपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त गावोगावी विविध गडावरून शिवज्योती चे आगमन…

लोणावळ्यात शिवछञपतींची भव्यदिव्य मिरवणूक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी मावळ तालुका शिवमय झाला.

Spread the love

छञपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त गावोगावी विविध गडावरून शिवज्योती चे आगमन.भांगरवाडी , लोणावळ्यात शिवछञपतींची भव्यदिव्य मिरवणूक ..! !On the occasion of Chhajpati Shivaji Maharaj’s birth anniversary, arrival of Shiv Jyoti from various forts in villages. Grand procession of Shiv Chhajpati in Bhangarwadi, Lonavala..! !

आवाज न्यूज: लोणावळा प्रतिनिधी . ता.११ मार्च .

छञपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त गावोगावी विविध गडावरून शिवज्योती चे आगमन, झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.भांगरवाडी , लोणावळ्यात शिवछञपतींची भव्यदिव्य मिरवणूक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी मावळ तालुका शिवमय झाला.भगवे ध्वज मोटारसायकलींना लावलेले, तसेच  तरूणांचे थवेच्या थवे येथे कोराईगड , तिकोना , लोहगड , विसापूर , तुंग , राजमाची , येथून शेकडोंच्या संख्येने आले होते.

छञपती शिवाजी महाराज चौकात शिवछञपती पुतळ्याचे परिसरात हिंदू समितीकडून, भव्यदिव्य मंडप उभारून शिवछञपती यांची जयंती दिमाखदार पध्दतीने साजरी करण्यात आली.

भांगरवाडी येथील शिवजन्मोत्सव मंडळाच्यावतीने शिवप्रतिमेची वाद्यांच्या तालावर, ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ता.११ रोजी दुपारी तीन नंतर उद्योजक , सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज यांच्या वतीने भव्य कुस्ती आखाडा आयोजित करण्यात येणार आहे..

शिवसेना लोणावळा शहराची शिवजयंतीनिमित्त आगवालाचाळ येथून छञपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याची भव्यदिव्य रथामधून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शिवछञपतींचे जीवनावर आकर्षक रथामागे जीवंत देखावा , ढोलताशांचा दणदणाट आणि गुलालाची उधळण तसेच सत्यनारायण पूजा , भगवा ध्वजाचे ध्वजारोहन , आणि अन्नदान असे कार्यक्रम शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक यांचे नेतृत्वाखाली तसेच मावळ तालुकाप्रमुख आशीष तथा गबळू ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कुसगाव बुद्रूक , कुसगाववाडी , औंढेखुर्द , औंढोली , भाजे , वाकसई , पाटण , केवरे , प्रेमनगर  मंडळांच्या वतीने विविध महाराष्ट्रातील किल्यांवर जावून शिवज्योती आणून गावोगावी भव्यदिव्य मिरवणूका काढण्यात आल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!