ताज्या घडामोडी

डॉ.डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा, इंद्रायणी नदीपात्रात बुडून मृत्यू..

अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी करत आहेत.

Spread the love

डॉ.डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा, इंद्रायणी नदीपात्रात बुडून मृत्यू..Dr. DY Patil engineering student drowned in Indrayani river bed..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ७ मार्च.

धूलवड खेळून झाल्यावर आंघोळ इंद्रायणीत आंघोळ करायला गेलेल्या एकवीस वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे.  या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव जयदीप पुरुषोत्तम पाटील व तो जळगाव येथील रहिवाशी आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराळे येथील डॉ.डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७ ते ८ विद्यार्थी धुलवड खेळुन झाल्यानंतर,सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात आंघोळीसाठी गेले असता, जयदीप पाटील याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याचा मित्र शरद शिवाजी राठोड याने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित सावंत,  पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी,पोलीस अंमलदार युवराज वाघमारे, सचिन काचोळे, शिवाजी बांगर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक निलेश गराडे त्यांची टीम दाखल झाली.

 

बोटीच्या साहाय्याने बुडालेल्या विद्यार्थ्याचा दोन तास शोध घेऊन मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढला. बुडालेला विद्यार्थी हा अभियांत्रिकी संगणक तृतीय वर्षात शिकत होता. धुलीवंदन खेळणे विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले. या अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!