अखिल भारत पद्मशाली महिला विभाग संघमच्या उपाध्यक्षपदी सरीता वडनाल तर सचिवापदी संगीता इंदापुरे…..!

सोलापूर :- अखिल भारत पद्मशाली महिला विभाग संघम ,मुख्यालय हैद्राबादचे वार्षिक सर्व साधारण सभा अध्यक्षा दुष्यंतला वनम यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले. सदर सभेत विविध विषय पारीत करण्यांत आले.
या सभेत अखिल भारत पद्मशाली महिला विभाग संघमचे उपाध्यक्षापदी सोलापूर येथील श्री मार्कंडेय सहकारी रूग्णालयाचे माजी संचालिका सरीता वडनाल यांची निवड आणि सचिवापदी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सहसचिवा संगीता इंदापुरे यांची निवड करण्यांत आले.
तसेच महिला पाॅवरलूम विभाग संघमच्या सदस्यपदी सुरेखा बोमड्याल व शांता अनुमल्ला यांची निवड करण्यांत आले. याप्रसंगी महिला सोशल मिडीया विभाग संघमच्या सदस्यपदी रेणुका बुधारम यांचीही निवड करण्यांत आले.
सर्व नविन पदाधिकारी व सदस्या यांचे अखिल भारत पद्मशाली महिला विभाग संघम अध्यक्षा दुष्यंतला वनम, उपाध्यक्षा पद्मा बसानी,प्रधानसचिवा सुनिता चिलवेरू तसेच अखिल भारत पद्मशाली संघमचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकूरवार,अध्यक्ष कंदगटला स्वामी, उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे मुख्यसमन्वयक रामकृष्ण कोंड्याल, महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे,अध्यक्ष भुपती कमटम, प्रधानसचिव यशवंत इंदापुरे,खजिनदार श्रीनिवास येमूल आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.



