आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोलापूरचे जिल्हा सरकारी वकिल प्रदीपसिंग राजपूत यांचा पुणे पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान…..!

Spread the love

सोलापूर : “इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल” यांच्यावतीने पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी शनिवारी सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते विशेष सत्कार आणि सन्मान करण्यात आला. ॲड. राजपूत यांनी सुमारे शंभर पेक्षा जास्त आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर दोन आरोपींना फाशीच्या शिक्षा मिळवून 100 पेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर आणि पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट एस. के. जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराच्या कार्यक्रमानंतर नवीन होऊ घातलेल्या कायद्यांवर म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता , आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही विषयांवर चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस प्रशासनाची बाजू या नवीन कायद्याला अनुसरून मांडली तर सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी सरकार पक्षाच्या वतीने नवीन कायद्याला अनुसरून सरकार पक्षाची आणि सरकारी वकिलांनी भूमिका मांडली. ॲड. एस. के. जैन यांनी आरोपींच्या वतीने नवीन कायद्याला अनुसरून त्यांची भूमिका मांडली. त्याचबरोबर निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर यांनी न्यायाधीशांच्या भूमिकेतून नवीन होऊ घातलेल्या कायद्यासंदर्भात आपली भूमिका मांडली .
या चर्चासत्रा नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित जनसमुदायातून आणि वकील वर्गातून नवीन कायद्यास आणि सद्य वस्तूस्थितीला आणि परिस्थितीला अनुसरून त्यांच्या मनात असलेल्या शंकांबद्दल सर्व पॅनल सदस्यांनी विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले. त्यांची उत्तरे तत्परतेने संबंधित पॅनलिस्ट यांनी दिली.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, या व अशा प्रकारचे चर्चासत्र वारंवार घडवून आणून कायद्याबाबत आणि लॉ अँड ऑर्डर बाबत जनजागृती करण्यात यावी. त्यास संपूर्ण पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहील. या आवाहनास अनुसरून उपस्थित जनसमुदायाकडून मोठ्या प्रमाणात दाद देण्यात आली, आणि प्रश्र्न विचारण्यात आले तर अशा प्रकारचे चर्चासत्र वारंवार घडवून आणण्याचे आश्वासन सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले.
“इंडियन ह्युमन राईट्स कौन्सिल” यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुख्य संयोजक ॲडव्होकेट आशिष सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पुणे अधिवक्ता परिषदेचे सर्व पदाधिकारी, धर्म जागरण विधी विभागाचे सर्व पदाधिकारी आणि पुण्यातील वकील वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ “राष्ट्रगीता”ने तर सांगता “वंदे मातरम”ने झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!