ताज्या घडामोडी

श्रीएकविरा कृति समितीतर्फे आयोजित बेमुदत उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगीत..

Spread the love

श्रीएकविरा कृति समितीतर्फे आयोजित बेमुदत उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगीत..

आवाज न्यूज . लोणावळा प्रतिनिधी, १२ डिसेंबर.

श्रीएकविरा कृति समितीतर्फे आयोजित बेमुदत उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगीत करण्यात आले.  सर्व कामे जनतेच्या सोयीसाठी करणार आहोत, असे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी वडिवळे , कामशेत रेल्वेगेटजवळ कृति समितीबरोबर चर्चा करून विनंती केल्याने स्थगित करण्यात आल्याचे श्रीएकविरा कृति समितीकडून आवाज न्यूजला  सांगण्यात आले.

 

श्रीएकविरा कृति समितीतर्फे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाकडे ता.१३ रोजी होणारे बेमुदत उपोषण मागे घेण्याबाबत (रद्द ) करण्याबाबत विनंती केली होती.त्यानुसार बेमुदत उपोषण मागे घेत असल्याचे पञ श्रीएकविरा कृति समितीतर्फे अधिका-यांचे कडे सुफूर्त करण्यात आले.

दिलेल्या आश्वासनानंतर रेल्वेगेट क्रमांक ४७,४२,३६ संबंधित सर्व कामे जनतेच्या सोयीसाठी करणार आहोत, असे रेल्वेचे अधिकारी व आमच्या चर्चेतून निदर्शनास येत आहे.आपण आमच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा केली आमचे म्हणणे ऐकून घेतले , त्याबद्दल आपले आभार ! आपण रेल्वे प्रशासनातर्फे बेमुदत उपोषण मागे घ्या , अशी विनंती केलेनुसार आम्ही हे बेमुदत उपोषण आंदोलन मागे घेत असल्याचे , तात्पुरते स्थगीत करत आहोत.आपण जनहितासाठी कामाची व्यवस्था करावी , जर या कामात दिरंगाई केली ,तर आम्हाला जनतेच्या हितासाठी प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलने करावी लागतील .या निवेदनावर श्रीएकविरा कृति समितीचे संस्थापक अध्यक्ष  भाई भरत मोरे , अध्यक्ष बाळासाहेब निवृत्ती भानुसघरे , माजी सरपंच नंदकुमार पदमुले , कार्लाचे उपसरपंच किरण हुलावळे , माजी पंचायत समिती सदस्य दिपकशेठ हुलावळे , माजी चेआरमन विठ्ठल वाघमारे , आदींच्या सह्या आहेत.‌

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!