ताज्या घडामोडी

जागतिक मानवी हक्क दिन विविध जनजागृती उपक्रमांनी होणार साजरा..

मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या माध्यमातून मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स याठिकाणी मानवाधिकार पुरस्कार प्रदान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

Spread the love

*जागतिक मानवी हक्क दिन विविध जनजागृती उपक्रमांनी होणार साजरा््

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ५ डिसेंबर.

मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या माध्यमातून मानवी हक्कांविषयी जनजागृती करण्याचे कार्य केले जात आहे.१० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त ‘जागर मानवी हक्कांचा’ या कार्यक्रमातून मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था,पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि जाधवर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

मानवीहक्कांची जनजागृती व्हावी या हेतूने ‘मानवी हक्क संरक्षण व संवर्धन’या विषयाने वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन केले आहे.याचबरोबर मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स याठिकाणी मानवाधिकार पुरस्कार प्रदान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात विधी क्षेत्रातून ऍड राजेंद्र अनभुले,सामाजिक क्षेत्रातून अमृता करवंदे,सामाजिक ग्रामीण क्षेत्रातून राजू केळकर,कला क्षेत्रातून चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र बरकडे,शैक्षणिक क्षेत्र संजय ढवळे,क्रीडा क्षेत्रातून प्रशांत आबने यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार साहित्य क्षेत्रातून दीपा देशमुख व सुशांत आशा बालहक्क कार्यकर्ते म्हणून यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कार प्रदान समारंभास डॉ सुधाकरराव जाधवर(माजी व्यवस्थापन सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),न्यायाधीश मंगल कश्यप (पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण), शशिकांत बोराटे (उपआयुक्त पुणे),नामदेवराव जाधव (लेखक,वक्ते उद्योजक), सुषमा चव्हाण (सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे),ऍड गायत्री सिंग (जेष्ठ विधितज्ञ उच्च न्यायालय मुंबई),ऍड शार्दूल जाधवर,ऍड सचिन झालटे-पाटील,डॉ यामिनी अडबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्य करीत असलेल्या संस्था व व्यक्तीच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ मिळावे या हेतूनेच संस्था गेली नऊ वर्षे विविध क्षेत्रातील लोकांना मानवाधिकार पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव सन्मान करीत आहे.

या सन्मानामागील भावना प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर,संचालक अण्णा जोगदंड,महाराष्ट्र सचिव अण्णा मंजुळे,मुख्य सल्लागार अनिल कदम,आकाश भोसले महाराष्ट्र सल्लागार कमिटी,मुख्य सचिव सोमनाथ सावंत,मुंबई प्रांत अध्यक्ष शकील शेख यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!