आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुमतीबाई गोरे ट्रस्टचा उपक्रमशील शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार सौ रोहिणी चौधरी यांना जाहीर….!

Spread the love

सोलापूर:- सुमतीबाई गोरे ट्रस्टचा उपक्रमशील शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार  सौ रोहिणी चौधरी यांना जाहीर करण्यात आला. सुमतीबाई गोरे ट्रस्ट यांच्यातर्फे चार वर्षापासून महाराष्ट्रातील उपक्रम शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते.
यंदा नूतन मराठी विद्यालय या शाळेतील सहशिक्षिका सौ रोहिणी चौधरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी झिरो एनर्जी शाळेचे श्री दत्तात्रेय वारे सर आणि प्रसिद्ध लेखिका इंदुमती जोंधळे मॅडम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण पार पडले. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र 21 पुस्तकाचा संच शाल व बुके देऊन सौ रोहिणी चौधरी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष श्री राजेश पटवर्धन सर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा जेधे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!