ताज्या घडामोडी

ऑन्को-लाईफ कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन..

११.११.२०२२ रोजी मा.आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सूचनेनुसार, विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता, ऑन्को-लाईफ कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन होईल.

Spread the love

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे,४ नोव्हेंबर.

जनरल हॉस्पिटल संचलित ऑन्को-लाईफ कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन सोमवार ता.७.११.२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते होणार होते .


आदरणीय पवार साहेब यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे,साहेब अनुपस्थित राहणार आहेत. त्या ऐवजी शुक्रवार ता.११.११.२०२२ रोजी मा.आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सूचनेनुसार, विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता, ऑन्को-लाईफ कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन होईल.

या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रमुख पाहुणे असून माजी आमदार कृष्णराव भेगडे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे.
अशी माहिती, तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड कॉन्व्हलसन्ट होमचे, अध्यक्ष , गणेश वसंतराव खांडगे यांनी आवाज न्यूजला दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!