ताज्या घडामोडी

सिलेंडर मधून गॅसची चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक

Spread the love

 

रावेत : गॅस सिलेंडर मधून गॅसची चोरी करणाऱ्या कामगाराला कारवाई करत पोलिसांनी अटक केली आहे. तर कामगारांसह गॅस एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तनगर किवळे येथे बुधवारी ( दि. 29 सप्टेंबर) रोजी ही कारवाई करण्यात आली.

अविनाश हरी नागरे वय 24 (रा. दत्तनगर, किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संतोष असे गुन्हा दाखल केलेल्या गॅस एजन्सीच्या मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किवळे परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी अविनाश कडून गॅसची चोरी केली जात होती. याबाबत गॅस एजन्सीचा मालक आरोपी संतोष  याला माहिती होती.

आरोपींकडून 21 हजार 903 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, 300 रुपयांचे दोन पितळी धातूचे रिफील, 220 रुपयांचे दोन नारंगी पाईप जप्त करण्यात आले आहेत. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia