ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अन्नधान्य देऊन वाढदिवस साजरा.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अन्नधान्य देऊन वाढदिवस साजरा.
आवाज न्यूज तळेगाव दाभाडे: भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने वृद्धाश्रमात धान्य दान करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. इंदूरी येथील संकल्प चॅरीटेबल ट्रस्ट संचालित स्नेहालय या वृद्धाश्रमात गहू, तांदूळ आणि तेल असा एक महिन्याचा शिधा संकल्प चारीटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष जयसिंग हिरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पुणे जिल्हा संघटक अरुण माने, मावळ तालुका कार्याध्यक्ष जमीर नालबंद, तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष राजेश बारणे, उपाध्यक्ष नवनाथ कुल, कार्याध्यक्ष दिलीप चौधरी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.



