ताज्या घडामोडी

औढोलीतील उद्योजिका सईंद्राबाई मांडेकर यांचे दुःखद निधन…

Spread the love

औढोलीतील उद्योजिका सईंद्राबाई मांडेकर यांचे दुःखद निधन… लोणावळा ता.१ (प्रतिनिधी ) औढोलीतील महिला सईंद्राबाई विलास मांडेकर (वय-४६) यांचे नुकतेच शुक्रवारी रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पती , अविवाहित मुलगा , अविवाहित मुलगी , सासू , सासरे असा परिवार आहे.
औंढोलीतील शिवछञपती तरूण मंडळाचे सदस्य , हाॕटेल फॕमिली कट्टा चे मालक कु.निलेश विलास मांडेकर हे त्यांचे सुपुञ होत. नवमी भजनी मंडळाचे पेटीमास्तर बाप्पू विठ्ठल मांडेकर हे त्यांचे सासरे होत. वेहेरगावचे माजी सरपंच दत्ताञेय मारूती पडवळ यांच्या त्या धाकटया बहीण होत्या . कै.सईंद्रा मांडेकर यांच्या अकस्मिकपणे निधनामुळे औंढोली गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या मनमिळावू व नम्र स्वभावामुळे पंचक्रोशित ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. .अपंगत्वावर मात करून दोघा पतीपत्नींनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. व सासूसासरे यांचे सहकार्याने संसार फुलवला होता..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!