ताज्या घडामोडी

कै.धनाजी बापूराव जाधव सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न

संजय जाधव यांनी केले वडीलांचे स्वप्न पूर्ण

Spread the love

तळेगाव : वडिलांचे स्वप्न पूर्ण करत संजय जाधव यांनी स्वखर्चातून बांधलेल्या कै. धनाजी बापूराव जाधव सभागृहाचा लोकार्पण सोहळा बुधवार दि. ८ डिसेंबर रोजी संपन्न झाला.

राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि हिंदू तालीम ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या लोकार्पण सोहळ्यात ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते पूजन करून फित कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी संत तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज ह भ प शिवाजी महाराज मोरे यांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले.त्याचबरोबर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मा. नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, तसेच आजी माजी नगरसेवक माजी शिक्षण मंडळ सदस्य व सभापती यांसह अनेक मान्यवर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या उपस्थित राहून या कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले. गेली २५ वर्षांपासून कार्तिकी एकादशीला खालापूर लासलगाव परिसरातील भाविकांचे दिंडी राजेंद्र चौकातील दत्त मंदिरात मुक्कामी येते. देवळात महिला वारकऱ्यांना तर पुरुष वारकऱ्यांना बाहेरील ओट्यावर मुक्काम करावा लागत असेल एक वर्षी पाऊस आल्याने वारकऱ्यांची गैरसोय झाली त्याची खंत निर्माण झाल्याने या ठिकाणी सभाग्रह बांधण्याचा मानस स्वर्गीय धनाजी जाधव यांनी केला होता. परंतु अचानक निधन झाल्याने त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांचे कनिष्ठ चिरंजीव संजय जाधव यांनी पूर्ण करत सदर सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न केला.

या सभागृहाचा वापर वारकऱ्यांची सेवा आणि मुक्कामासाठी केला जाईल. तसेच धार्मिक कार्यक्रम आणि गोरगरीब जनतेसाठी अल्पदरात सभागृह उपलब्ध केले जाईल. त्याचबरोबर त्या सभागृहात सामाजिक उपक्रम राबवले जातील असे आश्वासन मंडळाकडून देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!