शिवसेनेचे सच्चे व निष्ठावंत मावळे हे उद्धव ठाकरेेंच्या व शिवसेनेच्या सोबत..
तालुक्यातील काही पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला कोणताही धक्का बसला नाही या उलट बैठकीची गर्दी पाहता मावळ शिवसेनेला नवी संजीवनी मिळाली
शिवसेनेचे सच्चे व निष्ठावंत मावळे हे उद्धव ठाकरेेंच्या व शिवसेनेच्या सोबत..
आवाज न्यूज: मावळ प्रतिनिधी शिवानंद कांबळे २६ जुलै निष्ठावंत मावळ तालुका शिवसेनेची आढावा बैठक द्वारकाधीश मंगल कार्यालयात पार पडली या बैठकीला मावळातील अनेक पदाधिकारी उपस्थित.
होते सर्वांच्या एक मताने गट तट न करता सर्वानी एक मताने एक निष्ठेने राहून संघटना कशी वाढवता येईल या विषयी पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले या समई शिवसेनेचे शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनीक मोठया प्रमाणात उपस्थित असल्या मुळे बैठकीला मेळाव्यााचे स्वरूप आले होते. 
तालुक्यातील काही पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला कोणताही धक्का बसला नाही या उलट बैठकीची गर्दी पाहता मावळ शिवसेनेला नवी संजीवनी मिळाली, आहे या पुढे कोणीही पक्ष सोडून जाणार नाही अशी सर्व पदाधिकारी यांनी शिवसेनिकांना शब्द दिला या बैठकीचे नियोजन मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.



