ताज्या घडामोडी

ओबीसी फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी वैशाली परदेशी..  ।। 

राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर ।।

Spread the love

 

ओबीसी फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी वैशाली परदेशी   

आवाज न्यूज: श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी..

सामाजिक कार्यकर्त्या वैशाली लालसिंग परदेशी यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

वैशाली लालसिंग परदेशी या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून सध्या त्या पुणे शहरातील काँगेस महिला आघाडीत सक्रिय असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन व ओबीसीच्या सर्व कार्यात त्यांनी आजपर्यंत नोंदवलेला त्याचा सहभाग याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या राज्य उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे.

या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड, संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव, दिपा ताई वैतकार मिनल लिंबोळे, विजया माळी, मंगल डफळ, विद्या कातखडे संग्राम नागरगोजे बीड जिल्हाध्यक्ष, स्वाती आघाव बीड जिल्हाध्यक्ष, रोहीणी आघाव तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!