ताज्या घडामोडी
सरस्वती विद्या मंदिर विद्यालयातील,विद्यार्थी यश संतोष मोरे याचे SSC परिक्षेत घवघवीत यश !
यशने ९५.२०% गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांक मिळवला.
“सरस्वती विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थी यश संतोष मोरे याचे SSC परिक्षेत घवघवीत यश संपादन!” यशच्या यशामागील संपुर्ण श्रेेय संतोष व त्याच्या परिवारातील सदस्यांना जाते.
सरस्वती विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थी यश संतोष मोरे, या ने SSC परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल, समर्थ विद्यालयातील १९८७ तील १० वीच्या बॅचच्या टीमने, संतोषच्या घरी जावून यशचा त्याच्या कुटुंबासह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 
यशने ९५.२०% गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांक मिळवला. त्यावेळेस सन्मानित करण्यासाठी, सचिन म्हसेटे, रघुनाथ ठाकर, बाळासाहेब भोसले, रोहिदास गायकवाड, संजय पानसरे, महामुनी, राजेंद्र पाटोळे, विठ्ठल कदम, सुनिल ढोरे, विलास चव्हाण संतोष मोरे, गोपाल परदेशी उपस्थित होते.



