आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा -खताळ

संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात ज्यांची दहशत दादा गिरी आहे ती मोडून काढण्याचे काम आता मतदारांनी ठरविले आहे या वेळची विधानसभेची निवडणूक सर्वसामान्य कष्ट करी दीनदलित गोरगरीब ज्येष्ठ नागरिक तरुण लाडक्या बहिणी या सर्वांनी हातात घेतली आहे त्यामुळे नक्कीच परिवर्तन होणार आहे या परिवर्तनाचा पण सर्वांनी खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलावा असे आव्हान महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी मतदारांना केले आहे संगमनेर खुर्द गटातील हिवरगाव पावसा निमगाव टेंभी शिरापूर रायते वाघापूर खराडी देवगाव जाखोरी कोळवाडे अंभोरे डिग्रस मालुंजे आणि पिंपरणे या गावांना महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी भेट देत मतदारांशी संवाद साधला या वेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे भाजप डॉक्टर सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष अभय बंगाळ माजी तालुकाप्रमुख काशिनाथ पावशे भाजप युवा मोर्चाचे गणेश दवंगे केशव दवंगे संदीप वर्पे भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुयोग गुंजाळ भाजप उपा ध्यक्ष संदेश देशमुख मराठा समन्वयक डॉ सतीश खर्डे देवगावच्या सरपंच सुनील लामखडे जाखुरीचे सरपंच नितीन पानसरे कोळीवाडे भूत प्रमुख सुरेश काळे यांच्यासह महायुतीचे पदाधि कारी कार्यकर्ते उपस्थित होते खताळ म्हणाले की म्हणाले कीसंगमनेर तालुका हा आमचा परिवार आणि कुटुंब आहे असे येथील लोकप्रतिनिधी सांगत आहे परंतु इतरवेळा कुटुंब आणि परिवार यांना का आठवत नाही वाळू तस्कर भू माफिया आणि चार बगल बच्चे हेच का त्यांचे कुटुंब आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला जर काही तरुणपुढेचालले तर त्यांचे विचार दाबण्याचे प्रयत्न सुरू आहे संगमनेर तालुक्यात तरुणांच्या रोज गाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे तालुक्यामध्ये विकास करताना कायमच भेदभाव केला जात आहे तो भेदभाव आपल्याला बाजूला सारायचा आहे त्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावागावातील तरुणांनी घराघरात जाऊन महायुतीचा विचार पोहोचवायचा आहे प्रत्येक गावातील तरुणांनी लाडक्या बहिणींनी मतं मिळवण्यात खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलावा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केला जात आहे मात्र या तालुक्यात महि लांचा अपमान केला जात आहे हे दुर्दैव आहे आपल्याला विकासाबरोबर राज कारण करायचे आहेत तर भ्रष्टाचाराला गाडायचे आहे त्यासाठी सर्वांनी या परि वर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं या निवडणुकीत अमोल खताळ हा महायुतीचा उमेदवार नव्हे तर तुम्ही सर्वजण उमेदवार आहेत असं मानून सर्वांनी या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!