आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

* दै.लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित*

Spread the love

सोलापूर प्रतिनिधी :-* जनक्रांती पत्रकारसंघ तथा बशिरुज्जीमां सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सोलापूर येथे घेण्यात आला या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरसय्या आडम मास्तर माजी महापौर महेश कोठे काँग्रेस चे अध्यक्ष चेतन नरोटे एम आय एम चे अध्यक्ष फारूक शाब्दी शिवसेनेचे अमोल शिंदे पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याच अनुषंगाने पत्रकारिता क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून धसका न्यूज नेटवर्क तथा अल्पावधीतच लोकप्रिय झालेले १ वर्षपूर्ती झालेले दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद ज्यांना आजवर अनेक आदर्श पत्रकार पुरस्कार कोरोना काळात जबाबदारीची पत्रकारिता करून योग्य भूमिका बजावणारे कोरोना योद्धा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.अश्या युवा संपादकाचा आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानपत्र सन्माचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जनक्रांती पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जगताप पत्रकार संघटनेचे सदस्य बशिरुज्जीमां सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रिजवान शेख इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!